सर्व प्रशाकीय कामकाज करणे व सभापती व मंडळ यांच्या आदेशाप्रमाणे कामे करणे
सर्व सचिवानी सांगितलेली / मदत करणे प्रशाकीय कामकाजास करणे व उपबाजार येथील कामकाज करणे, सभापती व मंडळ यांच्या आदेशाप्रमाणे कामे करणे
दैनदिन व्यवहाराचे नोंदी टॅली सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करुन आर्थिक पत्रके तयार करणे तसेच बँक संबंधीत सर्व व्यवहाराचे कामकाज करणे. आर्थिक वर्षात अर्थसंकल्प पणन मंडळाकडे सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर तसेच विविध देय भरणा करणे. लेखा विभागा संबंधित सर्व कामकाज करणे.
दैनंदिन होणारी शेतमाल आवक छाननी करणे,बाजार भाव काढणे,खरेदीदार यांच्याकडे होणारा मार्केट सेस बाबत माहिती काढून रोखपाल विभाकडे सदर करणे, माहेवारी, दैनंदिन, हप्तेवारी,वार्षिक, खरेदीदार नावाप्रमाणे आवक व बाजार भाव माहिती नोंद ठेवणे
बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, रोजंदारी कामगार यांचे आस्थापना संबंधीत सर्व आदेश काढणे रजा खतावनी नोंदविने त्यांचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे त्या संबंधीत सुचना पत्र देणे इत्यादी.
बाजार समिती मध्ये खालील प्रमाणे परवानाधारक आहेत.
अनु.क्र. | अनुज्ञप्ति प्रकार | एकुन अनुज्ञप्ति |
---|---|---|
१ | अडते | १४० |
२ | खरेदीदार | १४६ |
३ | हमाल | ३३७ |
४ | मापारी | ६७ |
५ | भाजीपाला आडते | १५ |
६ | मदतनीस | १९ |
७ | प्रक्रीयाकार | २ |
सर्व परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डमध्ये खरेदी – विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड संगणका मध्ये टाकून व मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी अचूक सर्व कनिष्ट लिपिक यांच्या मार्फत केले जाते.
दैनंदिन अडत / खरेदी बिलांची माहवार तपासणी केली जाते.
शेतक-यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजार मध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतक-यांना शेतमाल कर्ज भावाने कावा लागुनये व त्यांची पैशाची गरज भगविण्यासाठी या करात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंळाचे निर्देशनाने व पावती वरून बाजार समितीचे स्व:फंडातुन शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या विभागात शेतक-यांने शेतमालवार आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करुण नियामाप्रमाणे तारण कर्ज देण्यात येते.
बाजार समिती मधील मार्केट फी, सुपरव्हिजन फी, शेतमाल तारण, गाळा भाडे व इतर मिसलेनियस भरणा स्विकारण्यात येतो. रोख विभागातील रोख, धनादेश (चेक), नेट बँकीग द्वारे भरणा झालेल्या रकमांच्या पावत्या बनवून सदर भरणा बाजार समितीचे बँक खाते मध्ये दैनंदीन जमा केल्या जातो. या सर्व व्यवहाराची नोंद कॅश बुकला घेतल्या जाते.