प्रस्तावीक
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिल्पकार स्व.बळीराम मोरे (पाटील) यांनी बाजार समिती स्थापन करण्याकरीता स्वतःच्या नावी असलेली जागा विनामुल्य दान करून त्याप्रमाणे वाशिम बाजार समितीची "संत तुकडोजी महाराज" यांच्या हस्ते मुहुर्ताचे नारळ फोडुन स्थापना दिनांक १०/०७/१८९९ नुसार हैद्राबाद रेसीडेंन्सी ॲक्ट प्रमाणे झालेली आहे. तेव्हापासुन त्यांनी सांगीतल्याप्रमाणे दरवर्षीच्या हंगामातील पहील्यांदाच यार्डमध्ये नविन शेतमाल विक्री करीता आणलेल्या शेतकरीराजाचा सम्मानपुर्व शाल व श्रीफल देवुन राशीची पुज्या करण्यात येते. त्यानंतरच हर्राशीला सुरूवात होते हा नाविण्यपुर्वक उपक्रम आजही राबविला/जोपासला जातो.
तसेच सद्याचे कामकाज महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम १९६३ व १९६७ प्रमाणे चालु आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्हयाची व अग्रगण्य बाजार समिती असुन बाजार समितीमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा शेतमाल विक्री व्यवस्थेकरीता उपलब्ध करून दिलेल्या आहेत व काळानुसार निर्माण होणाऱ्या सुविधा निर्माण करण्याचे दृष्टीने प्रयत्न चालु आहेत व करण्यात येत आहे. तसेच अनेक शेतकरी प्रतिनिधींनी हया संस्थेचे प्रतिनिधीत्व केले. भारत हा कृषी प्रधान देश असल्याने या देशातील जनतेचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. त्यामुळे मोठया प्रमाणात ग्रामीण भागातील जनता ही शेती उत्पन्नावर अवलंबून होती. त्यामुळे स्वातंत्रपुर्वी काळामध्ये विकेंद्रित बाजार व्यवस्था असल्यामुळे शेतकऱयांना शेतमाल विक्री करीता आठवडी बाजार अथवा बाजार हक्काची जागा शेतमाल विक्री करीता उपलब्ध होत्या. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीस १२६ वर्ष पुर्ण झाले आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची रचना बाजार समितीच्या कायदयातील कलम १३ नुसार करण्यात आलेली असुन, सेवा सहकारी संस्था याच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्याने निवडुन दिलेले एकुण ११ सदस्य त्यामध्ये २ महिलांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी निवडुण दिलेले ४ सदस्य, लायसन्स धारक हमाल मापारी यांनी निवडुण दिलेले १ सदस्य, लायन्सस धारक व्यापारी व अडते यांनी निवडुण दिलेले २ सदस्य, असे एकुण १८ सदस्य तसेच मा.सहाय्यक निबंधक,वाशिम १ प्रतिनिधी, याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ कार्यरत आहेत.
कार्यक्षेत्र
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाशिम तालुका पुरते मर्यादित असुन सदर कार्यक्षेत्रात एकुण १३० खेडयाचा समावेश आहे. वाशिम बाजार समितीनी अनसिंग येथे उपबाजार आवाराची स्थापना १९७१ मध्ये केलेली असुन सदर उपबाजारास २५ खेडयाचा व आजुबाजुचे जिल्हयातील शेतमाल विक्रीसाठी येतो. वाशिम बाजार समितीनी उपबाजार राजगांव आवाराची स्थापना दिनांक ०४/०१/२००७ रोजी केली आहे. वाशिम मुख्य यार्ड करीता ११ हेक्टर २४ आर जमीन आहे. उपबाजार अनसिंगचे ४ हेक्टर ८६ आर आहे. तसेच उपबाजार राजगांव क्षेत्र ४ हेक्टर जमिन खरेदी केलेली आहे. मागील आमसभेमध्ये पार्डी टकमोर येथे उपबाजार चालु करणे बाबत काही कास्तकारांनी प्रश्न मांडला होता. तसेच त्यावर वाशिम बाजार समितीचे संचालक श्री.विठ्ठल उर्फ राजुभाऊ चौधरी यांनी सुध्दा दिनांक २०/०८/२०२४ रोजी दिलेल्या पत्रामध्ये नमुद केल्यानुसार वाशिम बाजार समितीचे पार्डी टकमोर येथे शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपबाजार चालु करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यावर वाशिम बाजार समितीचे सभापती श्री.महादेव पुं.काकडे साहेब यांच्या आदेशानुसार व सर्व सन्मानीय संचालक यांच्या सहकार्याने पाठपुरावा करून पार्डी टकमोर येथे लवकरच उपबाजार चालु करण्यात येईल.
नियमन
वाशिम मुख्य यार्ड येथे सोयाबीन, तुर, चना, उडिद, हळद, मुंग, चिया, गहु, ज्वारी हा शेतमाल जास्त प्रमाणात विक्रीस येतो व तिळ, मक्का, करडी, मोहरी, जवस, कस्तुरी भेंडी, बाजरी, कल्वंजी व इतर शेतमाल हंगामानुसार विक्रीस येतो तसेच उपबाजार अनसिंग येथे कापुस उडिद, मुंग, गहु, सोयाबीन, चना, तुर, हळद, ज्वारी व इतर असे शेतमाल विक्रीस येतो.
तसेच उपबाजार अनसिंग येथे कापुस उडिद, मुंग, गहु, सोयाबीन, चना, तुर, हळद, ज्वारी व इतर असे शेतमाल विक्रीस येतो.
वाशिम बाजार समितीनी भाजीपाला व फळफळाचे सुध्दा नियमन करण्यात आलेले असुन नोटीफिकेशन नुसार सदर शेतीमाल कायद्यानुसार नियंत्रीत करण्यात आला आहे. परंतु अहवाल वर्षात सदर बाजार समितीच्या अधिपत्याखाली भरविण्यात येत आहे.
वाशिम बाजार समिती ही नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देऊनच काम करत आली आहे व येणाऱ्या बदलांना सामोरे जाऊन निश्चीतच शेतकरी हित जपण्याचा प्रयत्न बाजार समितीचे प्रशासनाकडुन, सर्व कर्मचारी वृंद तसेच बाजार समितीमधील आडते, व्यापारी,हमाल,मदतनीस,मापारी व इतर घटक यांच्याकडुन करण्यात येत आहे व कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिमच्या ब्रिद वाक्यामधुनच ध्येय स्पष्ट होते.