
कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशिम ता.जि.वाशिम.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिल्पकार स्व.बळीराम मोरे (पाटील) यांनी बाजार समिती स्थापन करण्याकरीता स्वतःच्या नावी असलेली जागा विनामुल्य दान करून त्याप्रमाणे वाशिम बाजार समितीची "संत तुकडोजी महाराज" यांच्या हस्ते मुहुर्ताचे नारळ फोडुन स्थापना दिनांक १०/०७/१८९९ नुसार हैद्राबाद रेसीडेंन्सी ॲक्ट प्रमाणे झालेली आहे. तेव्हापासुन त्यांनी सांगीतल्याप्रमाणे दरवर्षीच्या हंगामातील पहील्यांदाच यार्डमध्ये नविन शेतमाल विक्री करीता आणलेल्या शेतकरीराजाचा सम्मानपुर्व शाल व श्रीफल देवुन राशीची पुज्या करण्यात येते. त्यानंतरच हर्राशीला सुरूवात होते हा नाविण्यपुर्वक उपक्रम आजही राबविला/जोपासला जातो. तसेच सद्याचे कामकाज महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम १९६३ व १९६७ प्रमाणे चालु आहे.
सर्व माहितीसाठी....